ज्येष्ठ साहित्यिक तथा कोमसाप संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२२ जाहीर

मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार - २०२२' व्यासंगी साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे आणि कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा केली.
सदर पुरस्कार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच २५ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी, औद्योगिक, समाजरचना, व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला क्रीडा या क्षेत्रात भरीव आणि पथदर्शी कार्य करणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. दोन लाख रूपये रोख, मानपत्र, शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला हा पुरस्कार पैदा मधु मंगेश कर्णिक यांना देण्यात येणार आहे.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मराठी साहित्यात सातत्याने कसदार लेखन करून मोलाची भर घातली आहे. त्यांच्या लेखन कलेचा विस्तार आणि आवाका लक्षात घेऊन तसेच मराठी साहित्यात केलेल्या बहुविध योगदानाची गौरवपूर्ण नोंद घेऊन सन २०२२ चा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार कर्णिक यांना देण्यात येत असल्याचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
पदाश्री मधु मंगेश कर्णिक यांनी १९९० साली रत्नागिरी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच कोकणातील साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलग व्हावे यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली आहे. तसेच मराठी साहित्यातील आय कवी केशवसुत यांचे जन्मगावी कवी केशवसुत स्मारक उभारून कवी केशवसुतांचे साहित्यिक कार्य आजच्या पिढीसमोर उभारले. महत्वाचे म्हणजे पदाश्री मधु मंगेश कर्णिक हे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सलग आठ वर्षे अध्यक्षपदी होते. तसेच अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांवर त्यांनी अत्यंत प्रभावी कार्य केले. म्हणूनच सन २००२ साली केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यासोबतच महाराष्ट्र राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव, कवी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान आदी पुरस्कारांसह पदाश्री मधु मंगेश कर्णिक यांना उल्लेखनीय असे ३० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
पदाश्री मधु आहे. मंगेश कर्णिक यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरावरून कौतुक करण्यासह अभिनंदन करण्यात येत
आदरणीय मधु भाईना मिळालेला हा सन्मान समस्त कोकण वासीयांना अभिमानास्पद : गजानन पाटीत
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांना नुकताच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे. त्याबद्दल आदरणीय भाईंचे मनःपूर्वक अभिनंदन. आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांना मिळालेला हा पुरस्कार समस्त कोकण वासीयांना आणि साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात सकारात्मक ऊर्जेने काम करणाऱ्या सर्वांनाच प्रेरणा देणारा असून सर्वांसाठीच हा क्षण अभिमानाचा आहे. आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आजपर्यंत आम्हा सर्वानाच गोलाचे मार्गदर्शन केले आहे. भविष्यात त्यांना अजूनही मोठे सन्मान मिळावेत यासाठी परमेश्वर त्यांना उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य देवो, हीच प्रार्थना.
Comments
Post a Comment