सायकलिस्टतर्फे आज जनजागृती रॅली

 रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त लोकशाही काळानुरुप सुदृढ आणि सशक्त व्हावी जास्तीतजास्त नवमतदारांनी मतदार नोंदणी करावी, तसेच असलेल्या मतदान ओळखपत्राला आधार लिंक करा या उद्देशाने प्रशासनामार्फत जनजागृती करण्यात येर आहे.

त्या अनुषंगानेच बुधवारी सकाळी ७ वाजता मारुत मंदिर येथून रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तसेच सर सायकलप्रेमी रत्नागिरीकरांच्या सहकार्याने उपविभागीर अधिकारी रत्नागिरी व तहसीलदार रत्नागिरीमार्फर सायकल रॅली काढण्यात येणार आहे जास्तीतजास्त सायकलप्रेमींनी या रॅलीमध्ये सहभार्ग व्हावे, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे करण्यात आले आहे.

ही रॅली मारुती मंदिर सर्कल जयस्तंभ एस. टी स्टैंड राम आळी - गोखले नाका कॉंग्रेस भवन आठवडा बाजार 1 असा असून जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

Comments