राज्य कला प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी ६२ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे आयोजित a करण्यात येणार आहे.
या प्रदर्शात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईन कलाकृती मागविण्यात येत आहेत. या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
इच्छुक कलावंतांनी दि. ७ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत कला संचालनालयाच्या www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन प्र. कला संचालक, कला संचालनालय, मुंबई यांनी केले आहे
Comments
Post a Comment