कोकणात थंडीचा कडाका वाढणार

 fog - Wiktionary

 

रत्नागिरी : सागरी पृष्ठभागाचे तापमान घसरल्याने कोकण किनारपट्टी भागात हलकी ते मध्यम स्वरुपाची थंडी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दिवाळीनंतर थंडीला कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सुरुवात झाली असून, येत्या काळात थंडीचा

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवसात परतीच्या पावसाने झोडपून काढले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. मागील चार महिने पावसाने चिंब भिजवल्यानंतर आता हिवाळा सुरु झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर एकाच आठवड्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मोसमी पाऊस माघारी फिरल्याच्या दिवसापासून कोकण किनारपट्टी भागातील तापमानात घट होऊन गारठा वाढू लागला आहे. तापमानातील ही घट २३ ऑक्टोबरपासून म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून कायम आहे.

जिल्ह्यातही सर्व ठिकाणी सध्या निरभ्र आकाश असून, कोरड्या हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे रात्रीचे तापमान कमी होण्यास पोषक वातावरण आहे. थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्याच्या समस्या भेडसावणार आहेत. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

Comments