गोविंदगडावर आज मशाल महोत्सव
चिपळूण : श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान अंतर्गत सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोविंद गडावर मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोवळकोट पेठमाप येथे ग्रामदेवत श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गोविंद गडावर सायंकाळी ५ नंतर मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुमारे साडेतीनशे मशाली प्रज्वलित करण्यात येणार आहेत.
या मशाली संपूर्ण गडाच्या तटबंदीवर लावण्यात येणार आहेत. गेली दहा वर्षे त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त देवस्थान अंतर्गत मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे करंजेश्वरी मंदिर व परिसरात दिव्यांची आरास करण्यात येते. त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त सोमवारी मंदिरानिमित्त सायंकाळी ५ वा. देवतांचे पूजन, त्यानंतर ऐतिहासिक देखाव्यासह शोभायात्रेचे आयोजन करून ही शोभायात्रा सायंकाळी ६ वा. गोविंदगडाकडे प्रस्थान करणार आहे.
गडावर शिव प्रतिमेचे पूजन तसेच गडावरील मंदिरातील रेडजाई देवीचे पूजन, दीपप्रज्वलित करण्यासह गडाच्या तटबंदीवर मशाली प्रज्वलित करण्यात येणार आहेत. रात्री ८:३० नंतर करंजेश्वरी मंदिरात गोंधळ कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होईल.
Comments
Post a Comment