दक्षिणेकडील राज्यांतील पावसामुळे कोकणात थंडी कमी

 

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम म्हणून सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही भागांत जोरदार पाऊस सुरू झाला असला तरी त्याचा काही प्रमाणात परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे.

सध्या राज्यात सर्वच भागांतील किमान तापमान सरासरीच्या खाली असल्याने गारवा कायम आहे. मात्र, दोन दिवसांनंतर तापमानात वाढ होणार असल्याने कोकण किनारपट्टी भागात थंडीचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, सोमवारी आणि मंगळवारी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Comments