जालगाव-ब्राह्मणडीमध्ये घराला आग; लाखोचे
जालगाव : दापोली तालुक्यामधील जालगाव ब्राह्मणवाडी येथे नितीन जाधव यांचे घराता अचानक आग लागून रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ११.३० या सुमारास
नितीन जाधव यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ७:३० वा. च्यादरम्यान घराला कुलूप लावून ते कामानिमित्त घराबाहेर गेलेले होते. ७.३० ते ११.३० पर्यंतच्या मुदतीत अचानक घराला आग लागली. यामध्ये घरातील वॉशिंग मशिन, टीव्ही, महत्त्वाची कागदपत्रे, गृह उपयोगी वस्तू, कपडे असे सुमारे १ लाख रुपयांचे साहित्य आगीत जळून खाक झाले. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
आग लागण्याचे कारण समजले शकले नाही. याबाबत पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात आकस्मित जळीत म्हणून नोंद करण्यात आली असून, या प्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक नलावडे करीत आहेत.
Comments
Post a Comment