श्री देव अंजनेश्वराचा आज मुख्य त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव

 

राजापूर : तालुक्यातील बारा गावांचे स्वयंभू जागृत देवस्थान असलेल्या मिठगवाणे येथील श्री देव अंजनेश्वराच्या मुख्य त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे.

सकाळी १० वाजता बलिपूजन, दुपारी १२ वाजता देवाला महाप्रसाद, दुपारी १२.३० ते २.३० या वेळात भाविकांना महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता त्रिपूर पूजन, रात्री १२ वाजता आरती, भोवती, लोटांगण, दरबार झाडणे आदी पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री २ वाजता लळिताचे कीर्तन सुरू होऊन सकाळी ४ वाजता उत्सवाची सांगता होणार आहे.

भाविकांनी दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त श्री देव अंजनेश्वर देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments