विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू
दापोली : दापोली तालुक्यामधील कोंढे शिगवणवाडी येथे राहणारे शांताराम शिगवण या ६५ वर्षीय वृद्धाचा विहिरीत पडून मत्य झाल्याची घटना सोमवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम शिगवण हे दारूचे व्यसनी होते. ते दररोज दारू पिऊन येत असत सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी ६:३० वाजण्याच्या सुमारास कोंढे शिगवणवाडी येथील बामण शेत या शेतातील सार्वजनिक विहिरीजवळ येऊन आपल्या अंगातील टीशर्ट काढून ते विहिरीच्या कठड्यावर ठेवून विहिरीच्या पाण्यात उडी मारली. त्यावेळी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. याची खबर त्यांचा मुलगा सुभाष शिगवण याने दापोली पोलिस स्थानकात दली. दापोली पोलिस स्थानकात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल पवार करीत आहेत.
Comments
Post a Comment