चिपळूणच्या संतोष केतकर यांनी काढलेली चलचित्र रांगोळी ठरतेय लक्षवेधी

रत्नागिरी : चिपळूण येथील नवा कालभैरव मंदिरात संतोष केतकर यांनी काढलेली चलचित्र रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
गाणाऱ्या व्हायोलिनसाठी प्रसिद्ध असलेले प्रभाकर जोग यांची चलचित्र किंवा हलती रांगोळी त्यांनी साकारली आहे. पाहिल्याचा येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत ही रांगोळी प्रदर्शनात राहणार आहे.
श्री. केतकर गेली अनेक वर्षे रांगोळी काढत असून नवा कालभैरव मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला त्यांनी काढलेली ही ४२ वी रांगोळी आहे. शाळेपासूनच त्यांना रांगोळीची खूप आवड आहे. कोणतेही प्रशिक्षण न घेता त्यांनी ही कला स्वतः अवगत केली आहे. प्रतिबिंब, पाण्याखालील आणि पाण्यावरील रांगोळीही काढतात. तसेच व्यक्ती, निसर्ग, पाने, फुले अशा रांगोळ्या काढायला त्यांना आवडते. इलेक्ट्रॉनिक मोटरचा वापर करून त्यांनी ही हलती रांगोळी काढली आहे.
Comments
Post a Comment