चाफेरी फाटा येथे ट्रकची चाकं तुटल्याने

रत्नागिरी : जयगड-खंडाळा मार्गावरील चाफेरी फाटा येथे गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ट्रकला अपघात झाला. या अपघातात ट्रकची पुढची चाके तुटली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जयगडहून रत्नागिरीच्या दिशेने कोळसा घेऊन ट्रक चालला होता. ट्रेक चाफेरी फाटा येथे आल्यावर चालकाला झोप अनावर झाली. ट्रक साइडपट्टीवरून बाहेर गेल्याचे लक्षात येताच ट्रक चालकाने त्याने ब्रेक लावला. त्याबरोबर ट्रक थांबला. मात्र ट्रकची पुढची दोन चाके तुटून पडली. सुदैवाने ट्रक गटारात कलांडताना थोडक्यात बचावला. त्यामुळे मोठा अपघात टळला.
Comments
Post a Comment