जिल्ह्यात आजपासून पक्षी सप्ताह

रत्नागिरी : जिल्ह्यात शनिवारपासून पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
यामध्ये पक्षीमित्र आणि स्रेहींना जिल्ह्याच्या राखीव जंगल क्षेत्रात विविध पक्षांचे दर्शन घेता येणार आहे. पक्षीमित्र मारुती चितमपल्ली यांचा ५ नोव्हेंबर या वाढदिवसानिमित्त तसेच पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा दि. १२ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असल्याने या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येतो.
या सप्ताहात कोकणातील पक्षी वैभव न्याहळता येणार आहे. यामध्ये हळद्या, धनेश, कोकिळा, कोतवाल, बूलबूल, कबूतर, वेडा राघू, शिंपी पक्षी या कोकणार आडळणाऱ्या अस्सल देशी पक्षांचे दर्शन घेता येणार आहे. सामाजिक वनिकरण विभागातर्फे यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment