कर्ज काढल्याच्या गैरसमजातून शिवीगाळीसह बेदम मारहाण प्रकरणी चौघांविरूद्ध अॅट्रासिटीनुसार गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील आरोग्यमंदिर येथील एका बँकेसमोर तरुणीच्या नावे कर्ज काढल्याच्या गैरसमजातून शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात अॅट्रासिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीमती घुडे, गणेश शिंदे व त्यांचा मित्र आणि एक पोलिस कॉन्स्टेबल (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) असे संशयित आहेत. ही घटना सोमवारी (ता. 7) सायंकाळी पाचच्या सुमारास शहरातील आरोग्य मंदिर येथील एचडीएफसी बँकेसमोर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नरेश विठोबा जाधव (वय 44, रा. बोद्धवाडी- सोमेश्वर, ता. रत्नागिरी) हे सकाळी अकरा वाजता शिवानी मेणे यांच्या परिवारास वडापाव घेऊन गेले होते. शिवानी यांचे संबंधीत ओळखीचे घुडे या नावाने जाधव त्यांना ओळखतात. शिवानीने घुडे यांना लग्नास नकार दिला होता. सायंकाळी जाधव हे शिवानी हिला घेऊन आरोग्यमंदिर येथील एचडीएफसी बँकेत आले होते. शिवानीची आर्थिक फसवणूक करणार असल्याच्या संशयावरून संशयित महिलाही तिच्या मागावर होती. तसेच अन्य व्यक्तही होत्या, असे प्राथमिक माहिती स्पष्ट झाले आहे.
तथापि तक्रारदार जाधव शिवानीला घेऊन बँकेत गेले तेव्हा तिची मैत्रीण आणि तिचे सहकारी बँकेत आले. त्यांना पाहून पैसे न काढता ते बाहेर आलो त्यांनी माझ्याकडे कर्ज काढल्याचा गैरसमज करुन काढलेली रक्कम माझ्याकडे मागण्यास सुरवात केली. जाधव यांनी मी रक्कम अथवा कर्ज काढलेले नाही असे सांगूनही संशयितांनी शिवीगाळ मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी पोलिस कॉन्स्टेबलने ही मारहाण केली. याप्रकरणी नरेश जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी भा.दं वि.कलम 323, 504, 34 सह अनुसुचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 3(2) व्ही, ए, 3 (1) (आर) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे करत आहेत.

Comments
Post a Comment