कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या ठिकाणांमध्ये तात्पुरता बदल

 Konkan Railway's Incredible yet Little Known Indian Success Story

रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या मशीद स्थानकाजवळील कार्नाक बंदर पूल पाडण्याच्या कामासाठी कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या मुंबईतून सुटण्याच्या आणि मुंबईत पोहोचण्याचा स्थानकांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. हा बदल १९ आणि २० नोव्हेंबर या दोनच दिवसांसाठी आहे, असे कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या बदलांनुसार मडगाव-मुंबई (क्र. 12052) जनशताब्दी एक्स्प्रेस तेजस एक्स्प्रेस (क्र. 22120), मांडवी एक्स्प्रेस या गाड्या दोन्ही दिवशी दादरपर्यंतच धावतील. मांडवी एक्स्प्रेस (क्र. 10104), कोकणकन्या एक्स्प्रेस (क्र. 10112) मंगलुरू मुंबई एक्स्प्रेस (क्र. 12134) या गाड्या पनवेलपर्यंतच धावतील.

जनशताब्दी एक्स्प्रेस (क्र. 12051) आणि तेजस एक्स्प्रेस (क्र. 22119) या दोन्ही गाड्या रविवारी (दि. २० नोव्हेंबर) दादर येथूनच सुटतील.

मांडवी एक्स्प्रेस (गाडी क्र. 10103) आणि मुंबई - मंगलुरू एक्स्प्रेस (क्र. 12133) या दोन्ही गाड्या रविवारी (दि. २० नोव्हेंबर) पनवेल येथून सुटतील, तर कोकणकन्या एक्स्प्रेस (क्र. 10111 ) १९ आणि २० नोव्हेंबर रोजी पनवेल येथूनच सुटणार आहे.

Comments