दोन -महाराष्ट्र नेव्हल युनिटचा कॅम्प आजपासून

रत्नागिरी : दोन -महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीचा राष्ट्रीय स्तरावरील मेनू कॅम्प आजपासून (दि. १५ नोव्हेंबर) सुरू होणार असून तो २४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

या कॅम्पची सुरुवात आज सकाळी साडेदहा वाजता रत्नागिरीतील भगवती जेटी येथे होणार आहे. या कॅम्पला एनसीसी महाराष्ट्र राज्याचे अधिकारी मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, एडीजी (एनसीसी) डायरेक्टर महाराष्ट्र ब्रिगेडुयर सुबोजित लहिरी, डीडी जीएन डायरेक्टर ब्रिगेडियर समीर सालुंखे, ग्रुप कमांडर एनसीसी ग्रुप (हेड क्वॉर्टर कोल्हापूर) कमांडर के.. राजेश कुमार आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments