अयोध्येहून निघालेली श्रीराम राज्य रथयात्रा आज रत्नागिरीत येणार

 

रत्नागिरी : श्रीराम राज्य रथयात्रा २०२२ ही विजयादशमीला म्हणजेच ५ ऑक्टोबर २०२२ पासून श्रीक्षेत्र आयोध्या येथून सुरू झाली आहे. ती संपूर्ण भारतभर तसेच नेपाळ देशातून ६० दिवस प्रवास करून गीताजयंती म्हणजेच ३ डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा श्रीक्षेत्र अयोध्या येथे जाऊन संपन्न होणार आहे.

सदर यात्रा चिपळूण, संगमेश्वर आणि हातखंबा मार्गे रत्नागिरी शहरात गुरुवारी 3 नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता पोहोचणार आहे. रत्नागिरी येथील मारुती मंदिर येथे राम भक्तांना दर्शनासाठी श्रीराम राज्य यात्रा थांबणार असून नंतर जयस्तंभ मार्गे आठवडा बाजारातील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे मुख्य रथासोबत आठ ते दहा वाहने निवासासाठी थांबणार आहेत. येथील कार्यकर्ते श्रीगुरुकृपा मंगल कार्यालय येथे निवासासाठी थांबणार आहेत.

शुक्रवारी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी आठ नंतर सदर यात्रा सर्व वाहनांचे पुन्हा हातखंबा मार्गे पाली त्यानंतर लांजा येथे रवाना होणार आहे.

Comments