शिर्के प्रशालेचे शिक्षक राजेश आयरे यांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

 

रत्नागिरी : येथील रा. भा. शिर्के प्रशालेचे शिक्षक राजेश आयरे यांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. असून आज (दि. ८ नोव्हेंबर) पुरस्काराचे वितरण ठाणे येथे होणार आहे.

राजेश आयरे गेली अनेक वर्षे शिर्के प्रशालेत कार्यरत आहेत. पूर्वी ते शिर्के गुरुकुल प्रकल्पात काम करत होते. शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्याचे योगदान आहे. योगाची जनजागृती व्हावी, याकरिताही ते काम करत आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची दखल घेत भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाकडून त्यांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Comments