अनिल परब यांना 'साई रिसॉर्ट' प्रकरणी खेड न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

खेड : रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना दापोलीतील मुरुड किनाऱ्यावरील साई रिसॉर्ट प्रकरणी मंगळवार दि.८ रोजी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
दापोली येथील गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दापोली पोलीस ठाण्यात सोमवारी दि.७ रोजी साई रिसॉर्ट प्रकरणी माजी पालकमंत्री आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरुद्ध भा. दं. वि. कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नुसार मंगळवारी दि.८ रोजी अनिल परब यांचे तर्फे वकील सुधीर बुटाला यांनी खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्या नंतर त्यांनी केलेल्या युक्तिवादानंतर माजी मंत्री अनिल परब यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करुत पुढील तारीख १४ डिसेंबर देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment