साळवी स्टॉप - नाचणे लिंक रोडवर जेष्ठ नागरिकांसाठी विश्रांती कट्ट्याचे उद्घाटन

 

रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये आणखी एका लोक उपयोगी उपक्रमाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला.

सकाळी आणि संध्याकाळी चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या जेष्ठ नागरिकांना विसावा घेण्याकरिता हक्काची अशी जागा या भागात नसल्याने जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब माजी सरपंच संदीप सावंत यांनी लक्षात आणून दिली आणि ही गैरसोय उद्योजक सौरभ मलुष्टे आणि दिपक पवार यांनी तत्काळ सोठवली.

साळवी स्टॉप प्रभाग क्रमांक 5 मधील साळवी स्टॉप ते नाचणे लिंक रोड दरम्यान ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आला आहे. याचे उदघाटन रविवारी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी सरपंच संदीप सावंत, शिल्पाताई सुर्वे, उद्योजक सौरभ मलुष्टे, उद्योजक दीपक पवार, पूजा दीपक पवार, पत्रकार सुनील चव्हाण यांच्यासह विजय सुर्वे, गणपत साळवी, श्री कोतवडेकर, सावंत देसाई, कदम, शैलेंद्र गोलतकर, सरेश वरक, दुबे काका, रमाकांत कांबळे, श्री. भरणकर आदी उपस्थित होते.

दररोज सकाळी व संध्यकाळी चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या भागात बसणायची सोय नव्हती. हि गोष्ट लक्षात आल्यावर नाचणेचे माजी सरपंच संदीप शेठ सावंत यांनी सदरची गोष्ट सौरभ मतुष्टे व दीपक पवार यांचा निदर्शनास आणून दिली. जेष्ठ नागरिकांची गरज लक्षात घेत या दोघांनी तात्काळ ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी कट्टा उभारण्याचा निर्णय घेत ती पूर्णत्वास नेला. रविवारी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा हस्ते श्रीफळ वाढवून याचे उदघाट्न करण्यात आले. बसण्याची चांगली सोप झाल्याने ज्येष्ठ नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त केले.

Comments