जलतरण तलावावर राज्यस्तरीय स्पर्धक असल्याचे सांगून अवैधरित्या प्रवेश होत असल्याची तक्रार

रत्नागिरी : काही क्रीडाप्रेमी नागरिकांनी रत्नागिरी येथील शासकीय जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाबाबत तक्रारी केल्या होत्या.
मागील दोन वर्षापासून सुमारे ३० ते ४० जलतरणपटूना सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सरावासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र नव्या व्यवस्थापनाने हि परवानगी नाकारल्याची तक्रार ना. उदय सामंत यांच्या जनता दरबारात करण्यात आली. तसेच येथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकावर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल असून येथे येणाऱ्या महिला व मुलींच्या सुरक्षेतेतेच्या दृष्टीने हे धोकादायक असल्याचे जनता दरबारात तक्रारदारांकडून सांगण्यात आले होते. यावर तातडीने निर्णय घेत सायंकाळी ७ ते ९ या वेळात राज्य, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय खेळाडूंना जलतरण तलाव उपलब्ध करू देण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या होत्या.
Comments
Post a Comment