आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे आजपासून श्रीमद् भागवत महापुराण कथा सप्ताह

 रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या रत्नागिरी विस्तार केंद्रामार्फत दि. ९ ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत एमआयडीसीतील लायन्स क्लब ऑफ आय हॉस्पिटल नजीकच्या श्री जगन्नाथ एंटरप्राइजेस येथील मंदिरात श्रीमद् भागवत महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्त भगवान श्रीकृष्ण मंदिरात सप्ताह कालावधीत रात्री ७ ते ७.१५ या वेळेत महामंत्र कीर्तन, रात्री ७.१५ ते ९ या वेळेत श्रीमद् भागवत कथाकथन, तर रात्री नऊ ते साडेनऊ या वेळेत भाविकांना महाप्रसाद याप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. रविवार दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी रोजी मंदिरात श्री गोवर्धन पूजा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भगवान श्रीकृष्णांची महती सांगणाऱ्या प्रवचनाचा लाभ घेतला.

Comments