रत्नागिरी जिल्हा पोलीस भरतीसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारणार

 Information about Police Bharti in English

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस शिपाई भरतीसाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीव्दारे दि. ९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत.

उमेदवाराला पोलिस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील पोलिस शिपाई पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment 2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.

यामध्ये उमेदवार एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल. नंतर लेखी परीक्षा ही पोलिस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलिस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरीक चाचणी घेण्यात येणार असून त्यात किमान ५० टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १.१०प्रमाणात उमेदवारांची निवड करुन त्यांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परिक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

शारीरीक आणि लेखी चाचणीमध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. या प्रक्रिये अंतर्गत तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पाणी करण्यात येतील. पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीमधील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. शारीरीक व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण, केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय १० डिसेंबर २०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.

भरती प्रक्रियेदरम्यान दोन्ही चाचणीना गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येणार आहे. कार्यालाने एकदा निशित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.

Comments