चिपळूणमध्ये श्री देव जुना कालभैरव मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव
चिपळूण : चिपळूणचे ग्रामदैवत श्री देव जुना कालभैरव मंदिर देवस्थान ट्रस्ट अंतर्गत असलेल्या विविध मंदिरात त्रिपुरारी आले आहे. तसेच उद्यापासून कालभैरव जन्मोत्सव कार्यक्रमाला
चिपळूणचे ग्रामदैवत श्री देव जुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत सोमवारी सायंकाळी ७ ते १० या वेळेत मंदिर ट्रस्ट अंतर्गत असलेल्या देवस्थानमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. गांधारेश्वर येथील श्री भवानी माता, वडनाका येथील एकविरा, शेट्ये आळी येथील श्री देव केदारेश्वर आदी मंदिरात सायंकाळी ७ वाजल्यानंतर त्रिपुरारी निमित्त दीपमाळा प्रज्वलित करण्यात येणार आहेत धार्मिक कार्यक्रमानंतर या दीपमाळा प्रज्वलित करून मंदिर परिसरात दिव्यांची आरास व रोषणाई केली जाणार आहे. तसेच उद्यापासून कालभैरव जन्मोत्सवास सुरुवात होणार आहे. पुढील आठ दिवस जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह भजन, कीर्तन व जन्मकाळ साजरा केला जाणार आहे.
Comments
Post a Comment