मुंबईतील छबीलदास शाळेत सिलेंडरचा स्फोट; जखमींना रुग्णालयात दाखल केलं

 

cylinder blast

Mumbai News: मुंबईतील दादर परिसरातील एका शाळेच सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यामुळे शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून या घटनेत ३ जण जखमी झाले आहेत.

मुंबई: दादर परिसरातील छबीलदास शाळेत सिलेंडरचा स्फोट झाला असून एकापाठोपाठ चार सिलेंडरचे स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत ३ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामुळे शाळेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बुधवारी पहाटे ५च्या सुमारास दादरमधील छबीलदास शाळेतील एलपीजी सिलेंडरचे स्फोट झाले. या सिलेंडर स्फोटाचा आवाज संपूर्ण परिसरात ऐकू आला. स्फोटामुळे इमारतीचे देखील नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिस पोहोचले असून मदत कार्य सुरू आहे.

Comments