Tata-Airbus: महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले....
![]()
Maharashtra Projects landed in Gujrat | विरोधक केवळ टिका करणे व लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करण्यापलीकडे काहीच करत नाहीत असा आरोप सामंत यांनी केला. एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता शिळ्या कढीला उत आणण्यात अर्थ नाही, नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले. तत्कालीन सरकारने तेव्हा काहीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा उदय सामंत यांनी केला.
रत्नागिरी: वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ठाकरे गटाकडून यासाठी शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. साधारण वर्षभरापूर्वी म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळातच टाटा-एअरबस प्रकल्प हा गुजरातमध्ये जाणार हे निश्चित झाले होते. तत्कालीन सरकारने तेव्हा काहीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा उदय सामंत यांनी केला.
टाटा-एअरबस प्रकल्पाविषयी केंद्र सरकार व संबंधित यंत्रणा यांच्यात वर्षभरापूर्वी सामंजस्य करार झाला आहे. पण महाविकास आघाडी सरकारने यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उद्योग मंत्रालयाकडून यासाठी कोणताही पाठपुरावा झालेला नाही. २१ सप्टेंबर २०२१ रोजीच या प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार झाला होता. पण आता हेच काही विरोधक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत, असा पलटवार सामंत यांनी केला.विरोधक केवळ टिका करणे व लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करण्यापलीकडे काहीच करत नाहीत असा आरोप सामंत यांनी केला. एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता शिळ्या कढीला उत आणण्यात अर्थ नाही, नाही, असेही उदय सामंत यांनी म्हटले.
वेदांता ग्रुपचा फॉस्कफॉन प्रकल्प यापूर्वीच गुजरातला गेल्यावर आता या प्रकल्पानंतर आता २२००० कोटी रुपयांचा टाटा एअर बसचा मोठा प्रकल्प आता गुजरात बडोदा येथे गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने रोजगाराची मोठी यावरून विरोधकांनी उद्योगमंत्री उदय सामंत याच्यावर निशाणा साधला आहे त्यावर उदय सामंत यांनी सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्यावर्षीच हा प्रकल्प तिकडे गेला.

Comments
Post a Comment