७ वर्ष बाजारावर राज्य करणारी मारुतीची SUV भारतीयांचा निरोप घेणार, ग्राहकांकडे आता या कारचा पर्याय

 

Maruti S-Cross SUV Discontinued

Maruti S-Cross SUV Discontinued : मारुती सुझुकीची एस-क्रॉस ही एसयूव्ही कंपनीने वेबसाईटवरून हटवली आहे. आता कंपनी या कारच्या जागी मारुती ग्रँड विटारा ही कार विकणार आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नवी दिल्ली : Maruti S-Cross SUV Discontinued : इंडो-जपानी वाहन निर्माती कंपनी मारुती सुझुकीची लोकप्रिय एस-क्रॉस एसयूव्ही कंपनीच्या वेबसाईटवर आता दिसणार नाही. कंपनीने ही एसयूव्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून आणि पोर्टफोलिओमधून हटवली आहे. या कारच्या जागी कंपनी आता मारुती ग्रँड विटारा ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही विकणार आहे. पूर्वी मारुतीच्या पोर्टफोलिओमध्ये विटारा ब्रेझा आणि एस-क्रॉस या दोन एसयूव्ही होत्या. परंतु आता कंपनी या दोन कार्सच्या जागी मारुती ब्रेझा आणि मारुती ग्रँड विटारा या कार विकणार आहे.

मारुतीची ग्रँड विटारा ही कार बाजारात दाखल झाल्यानंतर एस-क्रॉस एसयूव्हीचं उत्पादनं बंद केलं जाईल असं आधीपासूनच म्हटलं जात होतं. आता याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

मारुती सुझुकीने त्यांची एस-क्रॉस एसयूव्ही २०१५ मध्ये भारतात लाँच केली होती. कंपनीने त्यांची नेक्सा डीलरशिप सुरू केल्यानंतर या डीलरशिपअंतर्गत सादर केलेलं हे पहिलं प्रोडक्ट होतं. यामध्ये १.६ लीटर टर्बो डिझेल इंजिन आणि १.३ लीटर टर्बो डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला होता. या कारने ७ वर्ष भारतीय रस्त्यांवर राज्य केलं. कंपनीने २०१७ मध्ये या कारचं फेसलिफ्टेड मॉडेल लाँच केलं होतं. कंपनीने गेल्या ७ वर्षात या कारचे १.६९ लाख युनिट्स विकले आहेत. भारतात या कारची सुरुवातीची किंमत ८.९५ लाख रुपये इतकी आहे. तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १२.९२ लाख रुपये इतकी आहे.

S-Cross SUV च्या जागी मारुतीच्या पोर्टफोलिओमध्ये आता नवीन ग्रँड विटारा ही कार दाखल झाली आहे. या कारची किंमत १०.४५ लाख रुपये इतकी आहे. या कारची किंमत एस क्रॉसपेक्षा खूप जास्त आहे. या कारमध्ये कंपनीने १.५ लीटर ४-सिलेंडर के १५ सी माईल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतं. या कारमध्ये स्मार्टप्ले प्रो+ कनेक्टिव्हिटीसह ९ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. या कारमध्ये सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि ३६० डिग्री कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे.

 

Comments