कामाची बातमी! तिमाही निकालानंतर RILच्या शेअर्सचे भविष्य काय, जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

 Reliance Industries (RIL) Share Price

Reliance Industries Stock Price: सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या शेअर्स वधारताना दिसत आहेत. आज या शेअरची किंमत १४९९ रुपयांवर पोहोचली आहे.

मुंबई : सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) च्या शेअर्स वधारताना दिसत आहेत. आज या शेअरची किंमत १४९९ रुपयांवर पोहोचली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल गेल्या आठवड्यात आले आहेत. वार्षिक आधारावर कंपनीचा नफा १३,५८० कोटी रुपयांवरून १३,५६५ कोटी रुपयांवर घसरला आहे. महसूल अंदाजानुसार आहे. निकालानंतर ब्रोकरेज हाऊसने शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
 
शेअर्ससाठी २८५५ चे लक्ष्य
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांच्या मते रिलायन्सच्या शेअर्समध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा १५ टक्के वाढ होऊ शकते. ब्रोकरेजने २८५५ रुपयांच्या लक्ष्यासह शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. शेअरची सध्याची किंमत २४७२ रुपये आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, रिलायन्सच्या महसूलात महसुलात वार्षिक आणि तिमाही आधारावर ३७ टक्क्यांनी आणि ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जी अंदाजापेक्षा चांगली आहे. तर EBITDA वर्ष-दर-वर्ष २० टक्क्यांनी वाढला आहे. मार्जिन १३.६ टक्क्यांवर गेला आहे.
 
विंडफॉल करामुळे नफा सपाट
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या म्हणण्यानुसार, विशेष उत्पादन शुल्काचा प्रभाव वगळल्यास, दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित ऑपरेटिंग नफा वार्षिक २७.८ टक्क्यांनी वाढून ३८,७०२ कोटी रुपये झाला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत ४,०३९ कोटी रुपयांचा विंडफॉल टॅक्स भरावा लागला.
 
रिलायन्स वर्षाच्या अखेरीस नवीन गॅस 'कंडेन्सेट फील्ड' सुरू करणार
रिलायन्स इंडस्ट्रीज लि. बंगालच्या उपसागरातील ब्लॉक KG-D6 मधील खोल पाण्याच्या क्षेत्रात असलेले MJ गॅस कंडेन्सेट (लिक्विड हायड्रोकार्बन) फील्ड या वर्षाच्या अखेरीस कार्यान्वित होईल. यामुळे देशातील एकूण नैसर्गिक वायू उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ होईल.

Comments