CCTV : सावधान! सकाळी दूध घेण्यासाठी घराचं दार उघडं ठेवताय? मग ही बातमी वाचाच

 

 

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पहाटेच्या वेळी दूध घेण्यासाठी घराचं दार उघडं ठेवत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण...

मुंबईकरांसाठी (Mumbai) महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत सकाळच्या वेळी अनेक जण घराचं दार उघडं ठेवतात आणि पुन्हा झोपी जातात किंवा मग आपल्या कामात व्यस्त होतात. पण मुंबईत चोरांची एक टोळी सक्रिय झाली असून या टोळीने अनेक घरांत चोरी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुख्य म्हणजे सकाळच्या वेळी या घटना होत आहेत. घरातील मौल्यवान सामान, पैसे, मोबाईल यांच्या चोर (Mumbai Crime News) पहाटेच्या वेळी होण्याच्या घटना वाढल्यात. आता तर या प्रकरणाचं एक सीसीटीव्ही फुटेजही (CCTV) समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पोलिसांनी महत्त्वाचं आवाहन केलंय.

मुंबई पोलीस सध्या चोरी करणाऱ्या एका टोळीच्या मागावर आहेत. चोरांची एक टोळी पहाटेच्या वेळी लोकांच्या घरात गुपचूप शिरून चोरी करत असल्याचं समोर आलं आलंय. या टोळीमध्ये 2 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे.

समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास एका इमारतीत चोरीची घटना घडलीय. यात चार जण दिसूल आलेत. त्यात एक लहान मुलाचाही समावेश आहे.

दुसऱ्या माळ्यावर एका फ्लॅटचा दरवाजा उघडून काही जण चोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलंय. तर एक महिला घराच्या बाहेर पहारा देताना दिसून आलीय. काही वेळानंतर सगळेच गुपचूप चोरी करुन पळून जाताना दिसून आलेत.

Comments