एसटी बसस्थानकांवर बचत गटांकरिता दिवाळी विक्री स्टॉल

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे दिवाळीच्या निमित्ताने सर्व बसस्थानकांवर महिला बचत गटांकरिता स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
बचत गटांनी तयार केलेल्या दिवाळीच्या खाद्यपदार्थांसह अन्य वस्तूंना बाजारपेठ मिळावी आणि त्याकरिता जागा उपलब्ध व्हावी, यासाठी हे स्टॉल्स देण्यात येणार आहेत.
रत्नागिरी विभागातील सर्व बसस्थानकांवर हे तात्पुरत्या स्वरूपाचे स्टॉल चालविण्यास देण्यात येणार आहेत. इच्छुक बचत गटांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.
Comments
Post a Comment