रत्नागिरी-नाटे एसटी फेरीच्या वेळेत बदल

राजापूर : रत्नागिरी एसटी आगारातून सकाळी ६.३० वा. सुटणाऱ्या रत्नागिरी-नाटे फेरीच्या वेळेत बदल करण्यात आला असून सकाळी ६ वा. रेल्वेस्टेशन मार्गे नाटे ही बस सोडण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेस्टेशनहून नाटेकडे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
जागिरी आगारातून सकाळी साडेसहा वाजता रत्नागिरी-नाटे अशी फेरी सुरू आहे. मात्र सकाळच्या सत्रातील या फेरीवा जागिरी रेल्वेस्टेशनहून नाटे परिसरात येणाऱ्या प्रवाशांना लाभ घेता येत नाही. त्यामुळे नाटे परिसरातील ग्रामस्थांनी बदल करून प्रवाशांच्या सोयीची रेल्वेस्टेशन मार्गे फेरी सरू करावी, अशी मागणी केली. त्यानुसार विभागीय नियंत्रक स्वागिरी यांनी याची दखल घेतली आहे.
ही फेरी १ नोव्हेंबरपासून सकाळी ६ वा. रत्नागिरी आगारातून सुटून रेल्वेस्टेशन मार्गे नाटेला रवाना होणार आहे. यामुळे नाटे, आडिवरे, गावखडी परिसरातीत सकाळी रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
Comments
Post a Comment