मोठी बातमी : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा नीरा नदीपात्रात मृतदेह सापडला

 

Satara News

Satara News : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. कालपासून ते बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरु होता मात्र, शोध सुरु असताना अखेर शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीपात्रात सापडला आहे.

सातारा : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. दोन दिवसांपासू ते बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरु होता मात्र, शोध सुरु असताना NDRF च्या पथकाला मृतदेह शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीपात्रात सापडला आहे. घोरपडेंची आत्महत्या की हत्या आता या प्रकरणाचं गुढ वाढलं आहे.

घोरपडे यांचे शेवटचे लोकेशन शिरवळ येथे दिसून आले होते. या प्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी पहाटे हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली होती. शिरवळ येथील नीरा नदीच्या पात्रालगत एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पूलाकडे जात असल्याचे दिसून आले होते. यामुळे नेमके कोणत्या व्यक्तीने नदीपात्रात उडी मारली आहे, याबाबत स्पष्टता होत नव्हती.

Comments