रत्नागिरीत दिवाळीला पावसाची उघडीप
रत्नागिरी : गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला असताना दिवाळीच्या पहिल्या दिवशी पावसाने उघडीप देत कोरडे वातावरण निर्माण झाले.
त्याच बरोबर मोसमी पावसाचा हंगाम संपल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असताना मंगळवारी कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाच्या सक्रियतेने आणि चक्रीवादळाच्या प्रभावाने हलका पाऊस होण्याची शक्यता होण्याचा दुजोरा दिला आहे. परतीच्या पावसाने कोकणात सातत्य राखल्याने ऐन खरीप हंगामात कापणीच्या काळात भात पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता आहे.
पावसाच्या सातत्याने शेतकरी हैराण झाले होते. मात्र, आता पाऊस ओसरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही गेल्या शनिवारी झालेल्या पावसाने पिकाची हानी झाल्याचे प्राथमिक दर्शनी कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे.
Comments
Post a Comment