मुंबईत छटपूजेचं राजकारण पुन्हा तापणार, मैदानात कृत्रिम तलाव उभारण्यास पालिकेने परवानगी नाकारली
![]()
घाटकोपर पूर्वेला असणाऱ्या आचार्य अत्रे मैदानात छटपूजेसाठी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. येत्या ३० आणि ३१ तारखेला छटपूजेचा उत्सव आहे. त्या अनुषंगाने दुर्गा परमेश्वरी सेवा मंडळाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव यांनी आचार्य अत्रे मैदानात कृत्रिम तलाव उभारण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने १८ ऑक्टोबर रोजी ही परवानगी नाकारली. त्यामुळे राखी जाधव यांनी आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
मुंबई: उत्तर भारतीय समाजाचा महत्त्वाचा सण असलेल्या छटपूजेच्या मुद्द्यावरुन मुंबईतील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईच्या घाटकोपर परिसरातील एका मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव (Rakhi Jadhav) यांच्या पुढाकाराने छटपूजेसाठी (Chhath puja) तयार होऊ घातलेल्या कृत्रिम तलावाला पालिकेकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. याविरोधात राखी जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या कायदेशीर लढाईमुळे येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे. (Chhath Puja in Mumbai)
घाटकोपर पूर्वेला असणाऱ्या आचार्य अत्रे मैदानात छटपूजेसाठी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. येत्या ३० आणि ३१ तारखेला छटपूजेचा उत्सव आहे. त्या अनुषंगाने दुर्गा परमेश्वरी सेवा मंडळाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव यांनी आचार्य अत्रे मैदानात कृत्रिम तलाव उभारण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने १८ ऑक्टोबर रोजी ही परवानगी नाकारली. त्यामुळे राखी जाधव यांनी आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. राखी जाधव यांनी आपल्या याचिकेत मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेत्यांच्या शिफारस पत्रांच्या आधारे महापालिका इतर ठिकाणी कोणत्याही पत्राशिवाय कृत्रिम तलाव उभारण्यास परवानगी देत आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. छटपूजा अवघ्या काही दिवसांवर आल्याने या याचिकेवर उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी होईल.
Comments
Post a Comment