पोलीस भरतीत जिल्ह्यातील तरुणांना प्राधान्य मिळालेच पाहिजे : किरण सामंत

रत्नागिरी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती दिली आहे. त्यामुळे एक नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. मात्र या भरती प्रक्रियेत त्या त्या जिल्ह्यातील तरुणांना प्राधान्य मिळालेच पाहिजे अशी मागणी कोकणातील उद्योजक आणी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे किरण सामंत यांनी केली आहे.
प्रत्येक रोजगारात स्थानिक तरुणांना प्राधान्य मिळाले पाहिजे या बाळासाहेबांच्या मूळ विचारांना धरून किरण सामंत यांनी हि मागणी केली आहे. राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यात मुंबई पोलीस दलात सहा हजार 740 पदे रिक्त असून संपूर्ण राज्यात 14 हजार 956 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. तीन नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर यादरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती policerecruitment 2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.
Comments
Post a Comment