दिवाळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर जाद गाड्या

रत्नागिरी : दिवाळीच्या निमित्ताने मध्य रेल्वेने कोकण आणि गोव्यातील प्रवाशांकरिता जादा रेल्वे सोडण्याचे घोषित केले आहे.
गाडी क्र. 01187 / 01188 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव रेल्वे स्थानक ते लोकमान्य टिळक) विशेष (साप्ताहिक) : गाडी क्र. 01187 १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दर रविवारी रात्री सव्वादहा वाजता सुटेल, ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी स्थानकांवर थांबेल.
दुसरी गाडी क्र. 01185 / 01186 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू आणि परत ही गाडी एलटीटीहून २१ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार येथे थांबून पुढे रवाना होईल.
Comments
Post a Comment