ग्रामपंचायत निकालानंतर उद्धव ठाकरे यांचा आ. राजन साळवी यांना दूरध्वनी..

 राजापूर : उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवींच्या नेतृत्वाखाली राजापूर, लांजासह रत्नागिरीमध्येही अपेक्षेप्रमाणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दणदणीत यश मिळवत ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला आहे.

ग्रामपंचायतीच्या निकालानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले वर्चस्व सिध्द करीत कोकणहा मूळ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हे सिध्द केले आहे.

राजापूर तालुक्यात एकूण १० ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले असून त्याठिकाणी ८ ग्रामपंचायतीवर तर लांजा मध्ये १५ पैकी ९ ग्रामपंचायतीवर व रत्नागिरी मध्ये ४ पैकी ३ ग्रामपंचायतीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकवला आहे.

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील देदीप्यमान व अपेक्षित विजयानंतर येथील बहतांशी विजयी सदस्यांनी आमदार डॉ. राजन साळवी यांच्या माध्यमान गावागावांत झालेली विकासकामे व शिवसैनिकांची अपार मेहनत यामुळे आपण हा विजय साकार शकल्याचे सांगितले.

शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवी यांनी हा अपेक्षित विजय मतदारांच्या विचाराचा, शिवसैनिकांचा असल्याचे सांगून तालुकाप्रमुख, सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, बूथप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, पं. स. सभापती, सदस्य, जि.प.सदस्य तसेच शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे मिळाल्याची प्रतिक्रिया दिली. ग्रामपंचायतीच्या निकालानंतर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपनेते तथा आ. डॉ. राजन साळवी यांचे दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले व मतदारांचे आभार मानले.

 

Comments