चिमुरडी घराच्या अंगणात खेळत होती; शेजाऱ्याने इशारा करुन बोलवलं, अन् पुढं घडलं धक्कादायक
![]()
Kalyan News Today: बारा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये घडली असून याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपी संजय बनसोडे याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. (Kalyan Crime News)
कल्याण: बारा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये घडली असून याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपी संजय बनसोडे याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. (Kalyan Crime News)
कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात ही घटना घडली असून रविवारी दुपारी पीडित मुलगी आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना आरोपी संजय याने इशारा करून तिला घरात बोलावले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात ही घटना घडली असून रविवारी दुपारी पीडित मुलगी आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना आरोपी संजय याने इशारा करून तिला घरात बोलावले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
संध्याकाळी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिने याबाबत आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकुण पीडित मुलीच्या कुटुंबाने थेट बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत संजय बनसोडे याला बेड्या ठोकल्या.आरोपी संजय याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Comments
Post a Comment