डॉ. प्रसाद कामत २९ ते ३१ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत

 रत्नागिरी : चेन्नईतील शंकर नेत्रालयाचे उच्च प्रशिक्षित रेटिना सर्जन डॉ. प्रसाद कामत, इन्फिगो लाइफ सायन्सेस ग्रुपचे प्रमुख रेटिना तज्ज्ञ असून ते येत्या २९ ते ३१ ऑक्टोबर २०२२ असे तीन दिवस रत्नागिरीत उपलब्ध आहेत. रेटिनाशी संबंधित गुंतागुंतीच्या रुग्णांवर सल्ला, निदान आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी ते पूर्ण दिवस उपलब्ध असणार आहेत.

डॉ. प्रसाद कामत यांनी आजपर्यंत मुंबई, कोलकाता, चेन्नई, इंदूर, जबलपूर, पटना, रांची, अहमदाबाद, सुरत या शहरांमधील अनेक रुग्णांना सल्ला व सेवा दिली आहे. डोळ्यांच्या रेटिनाशी संबंधित सल्ला हवा असणाऱ्या रुग्णांनी अपॉइंटमेंटसाठी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल (साळवी स्टॉप, रत्नागिरी) येथे ९३७२७६६५०४ या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

Comments