पोलीस मध्यरात्री अचानक निघून गेले आणि आमच्या घरावर हल्ला झाला; विक्रांत जाधव यांचा आरोप

रत्नागिरी : आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी नवी माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करत आहेत.
दरम्यान भास्कर जाधवांनीच हे स्वतःला प्रसिद्धी मिळावी सुरक्षा मिळावी यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप भाजप नेते परिमल भोसले यांच्याकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा काढण्यात आल्याचे पत्र भास्कर जाधव यांना मंगळवारी रात्री देण्यात आले. त्यानंतरच काहीवेळात हा हल्ला झाला. त्यामुळे या सगळ्याची गंभीर दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे.
मात्र, भाजपने भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ला केवळ एक बनाव असल्याचे म्हटले आहे. गाडीच्या काचा फोडणे, घराच्या काचा फोडणे याला भ्याड हल्ला म्हणतात. हे सगळं केवळ एक षडयंत्र आहे. त्यांच्या अंगणात केवळ स्टम्प व रिकामी बॉटल मिळाली. याला भ्याड हल्ला म्हणत नाहीत. हा सगळा भास्कर जाधव यांनीच रचलेला कट असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. चिपळूण शहरातील आमचे बॅनर ज्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी फाडले त्यांचावर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा, अन्यथा भाजप आंदोलन करेल रस्त्यावर उतरून हायवे जाम केला जाईल, असा इशारा भाजपकडून देण्यात आला.
Comments
Post a Comment