राम, सीता आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत असलेल्या कलाकारांचं नाटक औरंगाबादेत का बंद पाडलं?

औरंगाबादेत नाटकादरम्यानच हायव्होल्टेज ड्रामा! विद्यार्थ्यांच्या नाटकावर कुणी घेतला आक्षेप?
राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेत काही जणांनी संताप व्यक्त केला होता. राम, लक्ष्मण आणि सीतेच्या अंत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेल्या भूमिकेमुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी चालू नाटक बंद पाडलं.
सीता आणि लक्ष्मणाच्या नात्यावरुन काही संवादांवर उपस्थित प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर हा वाद वाढला आणि अखेर नाटक बंद पाडण्यात आलं.
सीता आणि लक्ष्मणाच्या नात्यात विनोदी आणि अपमानित करणारं सादरीकरण नाटकात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी या नाटकीतील संवाद आणि पात्रांवरुन गंभीर आरोप केले. भावना दुखावल्या गेल्यानं अखेर या नाटकावर प्रयोग बंद पाडण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद इथं युवा महोत्सव 2022 सुरु होता. या युवा महोत्सवाच्या स्टेज क्रमांक 3 इथं नाट्यरंग सुरु होता. यावेळी राम, सीता आणि लक्ष्मण अशी पात्र असलेलं एक नाटक सादर केलं जात होतं. या नाटकावेळी प्रेक्षकांमध्ये कुजबूज सुरु झाली.
नाटकातील लक्ष्मणरेषेच्या प्रसंगानंतर काही प्रवाशांनी दालनात उतरुन हा प्रयोग बंद पाडला. त्यानंतर स्टेजवरुन कलाकरांना आतमध्ये पाठवणयात आलं. यानंतर गोंधळ घालत या नाटाकाचा प्रयोग थांबवण्यात आला. तसं जय श्री रामच्या घोषणाही देण्यात आल्या. यानंतर नाटक पूर्ण करण्याची विनंतीही आयोजकांकडून करण्यात आली.
Comments
Post a Comment