आईने आवडती भाजी केली नाही, मग या मुलाने जे केलं ते भयंकरच...

 Ludhiana son killed mother

 

Crime News: एका मुलावर आईच्या हत्येचा आरोप आहे. या खळबळजनक घटनेने आजूबाजूचे नागरिकही हैराण झाले आहेत. हत्येचे कारणही तितकेच धक्कादायक आहे.

 
लुधियाना: पंजाबमधील औद्योगिक शहरांपैकी एक असलेल्या लुधियानामध्ये एक अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. येथे एका मुलावर आईच्या हत्येचा आरोप आहे. या खळबळजनक घटनेने आजूबाजूचे नागरिकही हैराण झाले आहेत. हत्येचे कारणही तितकेच धक्कादायक आहे.

आईने दुधीची भाजी केली होती जी मुलाला अजिबात आवडली नाही. त्यामुळे त्याने आईला दुसरी भाजी करायला सांगितली, मात्र आईने नकार दिला. त्यावरुन संतापलेल्या मुलाने आधी आपल्या वृद्ध आईला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याचे वडील आईला सोडवण्यासाठी आले असता त्यांनीही मारहाण केली. पण, या क्रूर मुलाचे मन भरले नाही, तेव्हा त्याने जन्मदात्या आईला पहिल्या मजल्यावरुन ढकलून दिले. या घटनेत वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलाने आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना लुधियानाच्या अशोक नगर भागातील आहे. मृत चरणजीत कौर (वय ६५) यांनी सोमवारी दुधीची भाजी केली होती, जी तिचा लहान मुलगा सुरिंदर सिंग याला आवडत नव्हती. आरोपी सुरिंदर सिंगने आईला दुसरी भाजी बनवण्यास सांगितले, मात्र चरणजीत कौर यांनी नकार दिला. यामध्ये आरोपीने रागाच्या भरात आईला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर सुरिंदरने स्वतःच्या आईला पहिल्या मजल्यावरून ढकलले, ज्यात ती गंभीर जखमी झाल्याचा आरोप आहे. चरणजीत कौर यांचा मंगळवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आरोपी सुरिंदरच्या नातेवाइकांनी सांगितले की, तो खूप रागीट स्वभावाचा आहे. सोमवारी दुपारची ही घटना असल्याचं आरोपीच्या चुलत भावाने सांगितले. सुरिंदरचे वडील वृद्ध महिलेला वाचवण्यासाठी आले असता आरोपींनी तिलाही मारहाण केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये सुरिंदरचे वडील गुरनाम सिंग हेही जखमी झाले आहेत.

Comments