देवरूखमध्ये २८ ऑक्टोबर रोजी मॉडेलिंग कार्यशाळा
देवरुख देवख येथे येत्या २८ ऑक्टोबर रोजी प्रथमच मॉडेलिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रात अनेकांनी देवरूख शहराचे नाव उज्वल केले आहे. आता देवरूखमधीत शाहिद शेख या तरुणाने मॉडेलिंग क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. नुकताच शाहीदने महाराष्ट्र वीर वीरांगना पुरस्कार मिळविला आहे. देवरूखमधील तरुण-तरुणींना मॉडलिंग क्षेत्रात संधी देण्यासाठी देवूरुख येथे प्रथमच मॉडेलिंग कार्यशाळा आयोजित केली आहे. सिवा असोसिएशनच्या मान्यतेने देवरूख येथे येत्या शुक्रवारी (दि. २८ ऑक्टोबर) हॉटेल पार्वती पॅलेस येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.
कार्यशाळेत १३ वर्षांपुढील तरुण-तरुणींना संधी दिली जाणार आहे. यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. यावेळी मॉडेलिंग क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मर्सिडीजची ब्रेड सेंडर शिवानी सिंग तसेच रॉक कच्छी आणि शाहरूख सय्यद हे नामवंत मंडल उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेमध्ये व्यक्तिमत्व विकास, फिटनेश, देहबोली, अभिनय, सादरीकरण, स्टेज डेअरिंग, संवादकौशल्य याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना करिअरच्या दृष्टीने नवी संधी उपलब्ध होणार आहे. या कार्यशाळेमधून ५ जणांची निवड केली जाणार असून त्यांना पुढील संधी दिली जाणार आहे.
नावनोंदणीसाठी हिदायत शेख, शगुप्ता शेख, शाहिद शेख, शितल शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. हुसेन शेख आणि युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.
Comments
Post a Comment