साळवी स्टॉप येथील विवाहितेचे फिनेल प्राशन

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील विवाहित महिलेने फिनेल प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. काजल कृष्णा बेगडा (वय २६, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे फिनेल प्राशन केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
ही घटना सोमवार, दि. १७ ऑक्टोबर दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काजल हिचे पती आपल्या लहान मुलीला बडबडला त्याचा राग मनात धरून काजलने घरात असलेले फिनेल प्राशन केले. फिनेल प्राशन केल्याचे लक्षात आल्यावर तत्काळ उपचारासाठी पती कृष्णा बेगडा यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तिची तब्बेत सुधारत आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment