सततच्या बदलत्या वातावरणाचा मच्छिमारांना फटका
![]()
रत्नागिरी : गेल्या काही दिवसात वातावरणात सतत बदल होत असून त्याचा परिणाम म्हणून मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. मासेमारी हा कोकणातील प्रमुख व्यवसाय असून, रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो कुटुंब मासेमारी या व्यवसायावर अवलंबून आहेत.
या व्यवसायातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी पावसाळ्यानंतर मासेमारी सुरू झाल्यापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलाचा मोठा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे मच्छीमारांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
ऑगस्ट महिन्यापासून पारंपरिक मासेमारी पाठोपाठ पर्ससीननेट मासेमारीही सुरू आहे. मात्र, मासे मिळेनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय खलाशांचाही प्रश्न अजूनही सतावत आहे. मासेमारी सुरू झाल्यानंतर एकापाठोपाठ वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने बहुतांश वेळा मासेमारी नौका किनाऱ्यावरच नांगरून ठेवण्यात येतात. तसेच खोल समुद्रात जाऊनही मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम माशांच्या निर्यातीवरही झाला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास मच्छीमारांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण होणार आहे.
Comments
Post a Comment