आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर आज ज्योती तोरस्कर यांची मुलाखत

 

 

रत्नागिरी : आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर पारंपरिक मच्छिमारांच्या समस्या जागतिक व्यासपीठावर मांडणाऱ्या ज्योती तोरस्कर यांची मुलाखत इंद्रधनुष्यमध्ये प्रसारित होणार आहे.

 

जागतिक पातळीवर मच्छीमारांना दिलं जाणार अर्थसहाय्य विकसित राष्ट्रांच्या मागणीनुसार बंद करण्यात येणार होत. अशा वेळी जागतिक व्यासपीठावर पारंपरिक मच्छीमारांना असणारी अर्थसहाय्याची गरज भारताने अधोरेखित केली. या प्रतिनिधींमध्ये मालवणच्या शिक्षका ज्योती तोरस्कर यांनी बोलीभाषेतून ह्या समस्या जागतिक व्यासपीठावर मांडल्या.

या सर्वांचा प्रयत्न यशस्वी होत या सबसिडीला 7 वर्षांची मुदत वाढवून मिळाली आहे. ह्या सर्व रोमांचक अनुभवाविषयी तसच पारंपरिक मच्छिमारांच्या समस्या यासंदर्भात आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोनाली सावंत यांनी ज्योती तोरस्कर यांची घेतलेली मुलाखत प्रसारीत होणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.10 मिनिटांनी ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 kh तसच newsonair या live मोबाईल अँपवर ऐकता येईल.

Comments