कोळीसरेतील नवदाम्पत्याची गळफास घेत
रत्नागिरी : तालुक्यातील कोळीसरे कोठारवाडी येथे नव्याने लग्न झालेल्या दांपत्याने रविवारी पहाटे 5.30 वा. सुमारास नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
संदीप जयवंत गोताड (27) व त्याची पत्नी पूजा संदीप गोताड अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. त्यांनी घरच्या वाश्याला गळफास लावून आत्महत्या केली.
खंडाळा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी संदीप व त्याची पत्नी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. सुमारे दोन महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत.
Comments
Post a Comment