पंढरपूर यात्रेसाठी राजापूर आगारात ३३ गाडया आरक्षित

 ST buses to get GPS for live-tracking

राजापूर : कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राजापूर आगारात ३३ गाडया आरक्षीत झाल्या आहेत. त्यानुसार ३३ गाड्या सोडल्या जाणार आहेत. यामध्ये दिनांक २९ ला तारेखला १, ३० तारखेला १७ तर ३१ तारखेला १५ गाड्यांचा सामावेश आहे.

दरवर्षी कार्तिकी एकादशीसाठी कोकणातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर यात्रेसाठी रवाना होत असतात. राजापूर तालुक्यातुन देखील वारकरी मोठ्या संखेने पंढरपुरला जातात. दरवर्षी राजापूर आगाराच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी खास गाड्या उपलब्ध करुन दिल्या जातात. यावर्षीची पंढरपूर यात्रा ही सुरु होत आहे. शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी येत असुन दिपावली सणाच्या पहिल्या दिवसापासुन समस्त वारकरी पंढरीच्या वाटेकडे मार्गस्थ झाले आहेत. या वारकऱ्यांना प्रवासाच्या दृष्टीने गैरसोय होवु नये म्हणुन राजापूर आगाराने खास गाड्या पंढरपूर यात्रेसाठी सोडल्या आहेत.

त्यानुसार २९ ऑक्टोबरला एक गाडी, ३० तारखेला १७ गाड्या तर ३१ तारखेला १५ गाड्या अशा एकुण ३३ गाड्या सोडल्या जाणार आहेत.

तर परतीच्या प्रवासादरम्यान वारकऱ्यांची गैरसोय होवु नये म्हणुन ४ नोहेंबरला १५ गाड्या तर ५ नोहेंबरला १६ गाड्या पंढरपूर वरून सुटणार आहेत. समस्त वारकऱ्यांची गैरसोय होवु नये म्हणुन राजापूर आगाराने चोख व्यवस्था ठेवली आहे. पंढरपुर यात्रेसाठी वारकऱ्यांकडुन आणखी बसची मागणी झाल्यास मागणीनुसार गाड्या सोडण्यात येतील अशी माहिती राजापूरच्या प्रभारी आगार व्यवस्थापिका श्रीमती एस. एस. पाटील यांनी दिली आहे.

Comments