खंडाळा घाटात ट्रकचा भीषण अपघात; साबणाचे खोके डोक्यात पडून चालकाचा जागीच मृत्यू

 mumbai-pune-accident

Accident On Mumbai Pune Expressway: पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर रात्री दहाच्या सुमारास मुंबईकडे जाणारा ट्रक उलटला आहे. हा ट्रक साबण घेऊन जात होता.

 
लोणावळा: पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर रात्री दहाच्या सुमारास मुंबईकडे जाणारा ट्रक उलटला आहे. हा ट्रक साबण घेऊन जात होता. तो ट्रक खोलीकडे जाणाऱ्या उतारावरील रत्यावर उलटला असून या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. साबणाचे खोके चालकाच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच आरआयबीचे पथक, महामार्ग पोलीस तसेच खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. द्रुतगती मार्गावर पडलेले साबणाचे खोके बाजूला करण्यात आले. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. चार ते पाच किलोमीटरच्या रांगा खंडाळा घाट परिसरात लागल्या होत्या. त्याचा अनेक चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला.
मुंबई आणि पुण्यात पाऊस पडत असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. अपघात झाल्याने वाहनाच्या मात्र रांगा लागल्याचे पहायला मिळतं आहे. खंडाळा घाटात अनेकदा अपघात होतात. त्यामुळे वाहतक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र शुक्रवारी रात्री पुणे आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक जण कोंडीत अडकून पडले होते.
 
रात्रीच्या वेळी अनेकदा मोठे कंटेनर मुंबई महामार्गावरून प्रवास करत असतात. त्यामुळे त्यांचा वेगही अधिक असतो. मात्र जर अपघात झाला तर मात्र त्याचा तोटा सर्वाना सहन करावा लागतो. दोन तीन तास वाहतूक कोंडी सहन करावी लागते. मात्र रात्री झालेल्या वाहतूक कोंडीचा चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्याचे पहायला मिळाले. सध्या महामार्गावरुन ट्रक हटवण्यात आला असून वाहतूक कोंडी कमी झाली आहे.

Comments