मिटक्या मारत खाता, तो पदार्थ ‘स्वच्छ’ आहे का? ‘एफडीए’कडून धक्कादायक खुलासा
![]()
नागपूर : वाडी पोलिस स्टेशन हद्दीतील डॉ. आंबेडकरनगरमध्ये ३५ जणांना विषबाधा झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोसाविक्रेत्याला ताब्यात घेतले. अन्न व औषध प्रशासन विभागाचा (अन्न) परवाना न काढताच तो विक्री करत होता. या प्रकरणानंतरच शहरातील इतर फिरत्या आणि ठेल्यांवर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. ‘मटा’ने पाहणी केली असता, अनेक खाद्यविक्रेत्यांकडे एफडीएची परवानगी नसल्याचेच पुढे आले. सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून खाद्यपदार्थ बनविले जात होते. हा नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळ असून एफडीएने आतातरी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
-परवाना न घेता विक्री करणाऱ्याला तीन महिने कारावास आणि पाच लाखांपर्यंतचा दंड होऊ शकतो. असे कठोर नियम असतानाही एफडीएला अंधारात ठेऊन नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
-चटपटीत, स्वादिष्ट खाद्यपदार्थांच्या शौकिनांसाठी रस्त्याच्या बाजूला असलेले ठेले प्रसिद्ध आहेत. सर्वच नियमांचे उल्लंघन करतात असेही नाही.
-काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे रीतसर परवानगी होती. हातमोजे आणि डोक्यावर कॅप घालूनच ते विक्री करत होते. मात्र, अनेक खाद्यविक्रेत्यांकडे अस्वच्छताच आढळून आली.
-रामदासपेठ, जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, यशवंत स्टेडियमसमोर, वाडी, सक्करदरा, छत्रपती चौक, शंकरनगर अशा विविध भागांतील काही विक्रेते नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले.
Comments
Post a Comment