अभ्यंकर-कुलकर्णीमध्ये अभिनय कार्यशाळेला प्रतिसाद

 रत्नागिरी : येथील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे अभिनय कार्यशाळेचे राधाबाई शेट्ये सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

प्रा. तेंडुलकर यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये अभिनयाबद्दल रुची निर्माण करणे आणि त्यांना भविष्यातील विविध स्पर्धासाठी सक्षम बनवणे हा आहे. उपप्राचार्य चिंतामणी दामले यांनी व्यक्तिमत्त्व विकासात अभिनयाचा उपयोग कसा होतो, हे सांगितले. सुरेंद्र जाधव, राजेश पवार हे या कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि एनएसएसचे विद्यार्थी आहेत. या दोघांनीही अभिनय म्हणजे काय, त्याची विविध अंगे, एखादी व्यक्तिरेखा कशी साकारावी याची माहिती दिली. तसेच रंगमंचाची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना स्वतंत्र विषय देऊन एखादी भूमिका कशी करावी, याचे प्रात्यक्षिकदेखील त्यांनी करून घेतले.

कार्यशाळेला कार्यक्रमाधिकारी प्रा. भालचंद्र रानडे, प्रा. अस्मिता तगारे, प्रा. शिवाजी जाधव आणि ९३ विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन ओंकार आठवले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्रवण पवळी याने करून दिला. कार्तिक भरवडे याने आभार मानले.

Comments